दंड प्रक्रिया संहिता, 1973 की धारा 144 के तहत अकोला शहर में शहर कोतवाली, रामदासपेठ, जूनशहर, डाबकी रोड पुलिस थानों की सीमा में। कर्फ्यू प्रतिबंधों में आंशिक संशोधन
अकोला शहरातील सिटी कोतवाली, रामदासपेठ, जुनेशहर, डाबकी रोड या पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार लावण्यात आलेले
संचारबंदीचे निर्बंधामध्ये अंशतः बदल करून 1. सिटी कोतवाली व रामदास पेठ या पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये लावण्यात आलेले संचारबंदीचे निर्बंध याव्दारे हटविण्यात येत आहे. तसेच सदर हद्दीमध्ये आज दि. 15/05/2023 पासून पुढील आदेशापर्यंत पुर्ण वेळ जमावबंदी लागू करण्यात येत आहे.
2. व जुने शहर, डाबकी रोड या पोलीस स्टेशन चे हद्दीतील पुर्ण असलेली संचारबंदी शिथील करून
a. आज दि. 15/05/2023 रोजीचे सायं. 06.00 वा पासून ते रात्री 08.00 वाजे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात येत आहे. b. व दि. 15/05/2023 चे रात्री 08.00 ते दि. 16/05/2023 थे सकाळी 08.00 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे.
c. दि. 16/05/2023 पासून पुढील आदेशापर्यंत, सकाळी 08.00 ते रात्री 08.00 पर्यंत जमावबंदी लागू राहील व रात्री 08.00 ते सकाळी 08.00 पर्यंत संचारबंदी लागू राहील.
सदर आदेशानुसार जमावबंदी कालावधीमध्ये उपरोक्त पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीचे एकत्र येण्यास अथवा एकत्र येऊन प्रवास करण्यावर बंदी राहील. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास सदर इसमांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.